महाराष्ट्र पोलीस भरती

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई पोलीस शिपाई व कारागृह शिपाई या पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
कारागृह शिपाई
पोलीस भरतीसाठी लागणारी वयाची अट
खुल्या प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 33 वर्षापर्यंत आहे
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता
उंची
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 155 सेमी असावी
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी
छाती
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिला लागू नाही
लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
  • सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

 विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
एकूण गुण – 100
शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण